कपालेश्वर महादेव दर्शन यात्रा | Kapaleeshwar Mahadev Tour

 कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक 

महाराष्ट्राच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पठारावर वसलेली नाशिक भूमी हिंदू धर्मियांसाठी पच्छिम काशी म्हणून ओळखली जाते. हे तीर्थस्थान हिंदुसाठी अत्यंत पवित्र आहे. खूप सारी पुरातन मंदिरे नाशिक येथील पंचवटी परिसरातील गोदाकाठी स्तित आहेत. जेवढे महत्व भारतात गंगा नदीला आहे, तेवढेच महत्व गोदावरी नदीला देखील आहे. 


कपालेश्वर महादेव मंदिरासमोर नंदी नसण्यामागचं कारण 

भगवान शंकराचे वाहन असलेला नंदी शिव गणा पैक्की एक आणि शंकराचा मुख द्वारपाल आहे. परंतु नाशिक येथील गोदाकाठी वसलेल्या कपालेश्वर महादेवा समोर नंदी दिसत नाही.  


मंदिरात नंदी नसण्या मागची एक आख्यायिका सांगितली जाते ति म्हणजे मार्कंडेय पुरणानुसार देवलोकी सर्व देवांची सभा भरली होती. तेथे पंचमुखी ब्रम्हाचे चार मुख वेदांचे पठन करत होते तर पाचवे मुख शिव आणि विष्णु ची निंदा करत होते. 


आपल्यावर होत असेलया निदेंमुळे भगवान शिवाने क्रोधित होऊन ब्रम्हांच्या ब्रम्हअस्त्राने पाचव्या मुखाचा शिरछेद केला. ब्रम्हा हे ब्राम्हण असल्यामुळे भगवान शंकराला ब्राम्हण हत्येच पाप लागल्यामुळे ते गोदावरी काठी हातांश बसून होते. तेव्हा त्यांच्या समोर एक गाई आणि वासरू एका ब्राम्हणाच्या अंगणात उभे असलेले त्यांनी पहिले. तो ब्राम्हण वासराच्या नाकात वेसण टाकण्याच्या प्रयत्न करत होता. ते वासरू म्हणजे नंदी चे साक्षात रूप होते. ते त्या ब्राम्हणचा विरोध करत होते, आणि ब्राम्हणाला मारण्याचा विचार करत होते. तेव्हा गाईने वासराला सांगितले की असे केल्याने तुला ब्राम्हण हत्येच पाप लागेल. त्यावर वासरू बोललेकी ब्राम्हण हत्येच्या पापा पासून मुक्त होण्याचा उपाय मला माहीत आहे. भगवान शिव त्या गाई वासराचे संवाद ऐकत होते. वासराचे शब्द कानी पडता भगवान शिवाची उत्कंठा वाढली. त्याच वेळी वासराने आपल्या शिंगाने त्या ब्राम्हणाला मारले. 


ब्राह्मण हत्येच्या पाप लागल्याने वासराचे अंग काळे पडू लागले. त्यावेळी वासरू गोदावरीच्या काठावर असलेल्या रामकुंडात स्नान करू लागलं. वासराच्या रूपात असलेला नंदी ते पाणी स्पर्श करू लागलं तसे त्याचे काळे पडलेले अंग पुन्हा पूर्व रूपात येऊ लागले. यातून त्या नंदी रूपी वासराची ब्राह्मण हत्येच्या पापातून मुक्तता झाली. हे पाहून भगवान शंकरांनी त्या रामकुंडत स्नान केले. त्यावेळी शिव ब्राह्मण हत्येच्या पापातून पाप मुक्त झाले. 


हे सर्व नंदी मुळे झाले होते, आणि याच गोदाकाठावर भगवान शंकराने नंदीला गुरु मानलं. नंदी गुरु स्थानी असल्यामुळे गुरुचा सन्मान म्हणून या ठिकाणी नंदीला स्वतः समोर द्वारपाल म्हणून न बसण्याचा आदेश दिला. यामुळे कपालेश्वर महादेव मंदिरासमोर नंदी नाही. 




 

कपालेश्वर महादेव दर्शन यात्रा


कपालेश्वर महादेव मंदिरातील सभामंडप प्रशस्त असून प्रवेश केल्यानंतर अत्यंत प्रसन्न वाटू लागते. मंदिराची वास्तूकला मंत्रमुग्ध करणारी आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांच्या कार्यकाळात झाला होता. मुख गाभाऱ्यातील प्रवेशद्वार चांदीने मंडवले असून महादेवाचे आवरण हे देखील चांदीचे आहेत. मंदिरा समोरील बाजूस गरुड वाहन श्री लक्ष्मी नारायण मंदिर आहेत.  कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतले असता बारा जोतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होऊन सर्व पातकाचा नाश होतो, असा पुराणात उल्लेख आहे. समोर गोदावारी नदी वाहताना दिसते. या गोदाकाठवर असलेल्या रामकुंडाला विशेष महत्व आहे. ग्रंथ पुरणानुसार प्रभू श्री रामाने पिता दशरथ राजा यांचे श्राद्ध विधी पूजन याच गोदाकाठी स्थित असलेल्या रामकुंडात केले होते. 


हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक पंचवटी येथे स्थित असून भारतातील एकमेव नंदी शिवाय असलेल हे एक मंदिर आहे. कपालेश्वर महादेव मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. 

जर तुम्ही पंचवटी कपालेश्वर महादेव मंदिराला भेट देण्याची योजना आखत असाल, तर तुम्हाला माहीत असायला हव्यात अशा काही गोष्टी येथे आहेत. 


तुम्ही याआधी इथे कधी आलाच नसाल तर नक्कीच ट्रिपची योजना करा.


जायचे कसे : 

पंचवटी कपालेश्वर महादेव मंदिर मुंबई पासून फक्त ३ तास ५० मिनिटे (१६७ कि. मी ) च्या अंतरावर आहे. तुम्ही रेल्वे मार्गाने अथवा रस्त्यानेही पोहोचू शकता कारण ते महाराष्ट्रा मधील प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे. मुंबई, दिल्ली किंवा तुमच्या सोयीनुसार इतर कोणत्याही ठिकाणाहून येथे पोहचू शकता. 

 

राहण्याची व्यवस्था : 

येथे राहण्यासाठी अनेक आलिशान पर्याय आहेत मंदिराजवळ निवासासाठी विविध पर्याय आहेत, ज्यात बजेट हॉटेल्स आणि लक्झरी रिसॉर्ट्स यांचा समावेश आहे. 


वेळ: 

रोज सकाळी ६ ते रात्री ११


करण्यासारख्या गोष्टी : 

रामकुंडात स्नान केल्यानंतर कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन मंदिराच्या अगदी जवळ असलेल्या काळाराम मंदिरालाही आवर्जून भेट द्यावी. 


खबरदारी : 

मंदिरात जाताना आपल्या वस्तूंची काळजी घेणे आणि मौल्यवान वस्तू घेऊन जाणे टाळणे महत्वाचे आहे. तसेच, पॉकेट आणि दलाल यांच्यापासून सावध राहावे.


पाहण्यासारख्या गोष्टी : 

येथेल पूजा आरती धार्मिक विधी प्रत्येकासाठी आनंददायी आध्यात्मिक अनुभव आहे. श्रावणातील सोमवार व खास करून महाशिवरात्री ला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. 


दर्शनीय स्थळे : 

गोदावरी, वारूनी, थारूनी यांचा त्रिवेणी संगम, रामकुंड, कपिला गोदावरी संगम, काळाराम मंदिर, मुक्तिधाम मंदिर, नवशा गणपती मंदिर, सोमेश्वर महादेव मंदिर 


एकंदरीत तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. या परिसरात आल्यावर श्रद्धा आणि आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण अनुभव मिळतो.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.